कांदळी गावच्या हद्दीत गांजाची विक्री करणाऱ्याला केली अटक नारायणगाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

नारायणगाव -( दि २३) प्रतिनिधी

कांदळी गावच्या हद्दीत असलेल्या विराज हाॅटेलसमोर गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या एकजणास नारायणगाव पोलिसांना ताब्यात घेतले आहे
याबाबत नारायणगाव पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सोमवारी ( दि 22 ) रात्री पावणेेेेदहा वाजण्याच्या सुमारास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक ताटे, पोलिस नाईक साबळे, पोलिस कॉन्स्टेबल कोबल पोलिस मित्र खंडे, पोलिस मित्र मुठे असे पुणे नाशिक हायवे रोड वर गस्त करत असताना मौजे कांदळी गावचे हद्दीत विराज हॉटेल चे समोरील मोकळ्या जागेत एक इसम हा त्याचे ताब्यातील स्कुटी मोटार सायकल नंबर एम एच 14 जे जी 9948 चे डिक्कीमध्ये बेकायदा बिगर परवाना गांजा विक्रीसाठी घेवुन येणार असल्याची बातमी गस्त घालणाऱ्या पोलीसांना मिळताच सदर ठिकाणी पोलीसानी सापळा लावला व थोड्याच वेळात वरिल वर्णनाची स्कुटी मोटार सायकलवर एक विधीसंघर्ष ग्रस्त बालक आला व कुणाची तरी वाट पाहत थांबलेले दिसला त्यास त्याचे नाव पत्ता विचारपुस करून मोटार सायकलची डीकी खोलण्यास सांगीतले असता डीकी मध्ये त्याने एका प्लास्टीकचे पिशवी मध्ये गांजा बाळगलेल्या स्थितीत मिळून आला सदर गांजा हा त्याने इसम नामे युवराज पांडुरंग राठोड (रा जांबुत फाटा कांदळी ता जुन्नर जि पुणे ) यांचेकडून आणला असल्याचे सांगीतले याबाबत नारायणगाव पोलिसांनी युवराज राठोड यास ताब्यात घेतले असून त्यांचे विरोधात गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 8(क) 20 (ब) || (अ) प्रमाणे कायदेशीर फिर्याद पो.ना.साबळे यांनी दिली असुन त्यांचे ताब्यातुन गांजा व स्कुटी वाहना सह एकूण 57650/- रू किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलिस स.ई. हिंगे हे करीत आहे.
सदरची ची कारवाई ही पुणे ग्रामीण चे पोलीस अधीक्षक श्री अभिनव देशमुख सो तसेच अप्पर पोलीस अधीक्षक सो, उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग जुन्नर श्री मंदार जवळे यांच्या सूचनेनुसार नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरिक्षक श्री पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक दिनेश साबळे पोलिस कॉन्स्टेबल सचिन कोबल पोलिस कॉन्स्टेबल शैलेश वाघमारे पोलिस मित्र आकाश खंडे पोलिस मित्र भरत मुठे यांनी केली आहे.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close