अमेरिकन नागरिकांना फसवणारे बोगस अमेझोन कॉल सेंटर उध्वस्त

नवी मुंबई ( ता 20 नोव्हेंबर )संतोष पडवळ कार्यकारी संपादक

नवी मुंबईतील रबाळे पो. ठाणेस गोपनिय बातमीदाराकडुन शिवशंकर हाईट, से. २० ऐरोली येथील इमारतीचे फ्लॅटमध्ये अवैधरित्या कॉल सेंटर सुरू असून, त्याद्वारे अमेरिकन नागरिकांची फसवणुक केली जात आहे, अशी खात्रीश बातमी मिळाली होती. मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने रबाळे पोलीसांनी सायबर एक्सपर्टसह दि. १८/११/२०२१ रोजी रात्रौ छापा टाकणेत आला.

सदर इमारतीमधील रूम नं. २९०१ मध्ये एकुण ७ इसम हे १० लॅपटॉपच्या वापर करून VOIP चे माध्यमातून अमेरिकन नागरिकांना अॅमेझॉन मधुन बोलत असल्याचे सांगून, त्यांचे अॅमेझॉन अकाउंट हॅक झाले आहे, असे भासवून त्यांना अँटिव्हायरस अथवा सेक्युरिटी सर्व्हिस घेण्यासाठी भाग पाडत असे. त्याकरिता गिफ्ट कार्ड द्वारे पैसे स्विकारून ती रक्कम ते हवालामार्फत प्राप्त करीत असल्याचे दिसुन आल्याने त्यांचेविरोधात रबाळे पो, ठाणे गुरनं ४७४/२१ भादवि ४१९,४२०,४६५,४६७,४७१,३४ सह आयटी अॅक्ट कलम ६६(ब)(क)(ड),७२ (अ),७५ सह भारतीय टेलिग्राफ कायदा कलम २५ (क) प्रमाणे गुन्हा नोंद करणेत येवुन सदर गुन्हयात खालील आरोपीतांना अटक करणेत आली आहे. आरोपीतांना मा. न्यायालयाने दि. २३/११/२१ पावेतो पोलीस कोठडी सुनावली आहे.
अटक आरोपीतांचे नावे
१) मेहताब आयुब सय्यद, वय-२७ वर्ष,रा.मालाड, ३) हुनेद शब्बीद कोठारी, वय-३५ वर्षे, रा.ग्रॅन्ड रोड, ५) सुरज मोहन सिंग, वय-२५ वर्षे, रा. कांदिवली ७)धर्मेश राकेश सालीयन, वय-३२ वर्षे, रा. भाईंदर –

, २) नौशाद रजी अहमद शेख, वय-२४ वर्षे, रा. मालाड, ४) सौरभ सुरेश दुबे, वय-२६ वर्षे, रा. मिरा-भाईंदर, ६) आसिफ हमीद शेख, वय-२३ वर्षे, रा. भाईंदर

जप्त मुददेमाल :- १० लॅपटॉप, २ राऊटर, ८ मोबाईल फोन, ४ हेडफोन,

फसवणुक करणेची पद्धत:• अमेरिकन नागरिकांनी केलेले कॉल इंटरनेटचे माध्यमातून कॉल सेंटरमधील लॅपटॉपवर वळविणे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. बिपीनकुमार सिंह, मा. सह पोलीस आयुक्त डॉ. श्री. जय जाधव, परि.-१, वाशी चे मा. पोलीस उप आयुक्त, श्री. विवेक पानसरे, वाशी विभागाचे मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. विनायक वस्त व वपोनिरी योगेश गावडे, रबाळे पो. ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अजय भोसले, पोलीस उपनिरीक्षक शिरस्कर, पोउपनिरी बोडरे, पोना/३१४६ गणेश वीर, पोशि/३४९९ बदुसिंग बंजारा, पोशि/१२२९९ चंद्रकांत कोणे, पोशि/१२६३२ दयानंद लाहांगे, पोशि/१२६२६ प्रताप पाटील या पथकाने केली आहे.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close