ताडोबा-अंधारी व्याघ्र वनपरिक्षेत्रात महिला वनरक्षकाचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू

चंद्रपूर, (ता 20 नोव्हेंबर ) प्रतिनिधी

चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कोलारा कोअर वनपरिक्षेत्रात आज सकाळी ८ च्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात स्वाती ढुमने (४३) या महिला वनरक्षकाचा मृत्यू झाला. वाघाने झडप घालून ढुमने यांना फरफटत जंगलात नेले. त्यानंतर काही वेळाने त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेने वनविभागात खळबळ माजली आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात सध्या वाघांच्या गणनेचे काम सुरू आहे. त्याच्या तयारीसाठी आज सकाळी वनरक्षक स्वाती ढुमने जंगलात गेल्या होत्या. कोलारा गेट येथे कोअर झोन ९७ मध्ये त्या गेल्या होत्या. तेथे ट्राझेक्ट लाईन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला. तेव्हा त्यांच्यासोबत असलेल्या ४ वनमजुरांनी वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याने स्वाती यांना फरफटत दाट जंगलात नेले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नंतर शोध मोहीम हाती घेतली. त्यावेळी स्वाती ढुमने यांचा जंगलात मृतदेह सापडला. या घटनेमुळे वनकर्मचारी हादरले आहेत.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close