समर्थ संकुलातील बावीस विद्यार्थ्यांची नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

बेल्हे -( दि १४) प्रतिनिधी)
बेल्हे येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) येथील इंजिनिअरिंग व बी सी एस महाविद्यालयातील २२ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.
ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये अभियांत्रिकी विभागातील १५ विद्यार्थ्यांची तर बी सी एस मधील ७ विद्यार्थ्यांची विविध नामांकित व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली.
समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभाग
श्वेता लोखंडे,काजल दाते,ज्ञानेश्वरी सातपुते,मीना नाईकोडी, तनुजा बढे,वैशाली परांडे या विद्यार्थिनींची अकसेंचर या कंपनीमध्ये तर प्रतीक्षा डावखर हिची कॉग्निझंट या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाल्याची माहिती अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी दिली.सदर विद्यार्थिनींना ४ लाखाचे पॅकेज देण्यात येणार असल्याचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.भूषण बोऱ्हाडे यांनी सांगितले
सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग:
रघुवीर चौहान-जे पी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.पुणेपंकज डेरे-बजरंग कन्स्ट्रक्शन सिद्धेश घाडगे-सह्याद्री असोसिएट विशाल घुले-साई कन्स्ट्रक्शन अभिजीत नेहे-डी जी एस टेक्निकल सर्व्हिसेस प्रा.लि.नाशिक रोहित पठारे-मोरया कन्स्ट्रक्शन प्रणित पवळे-ताज कन्सल्टंट अँड आर्किटेक्चर रिशान शेख-श्रुष्टी इन्फ्रास्ट्रक्चर एल एल पी रायगड सिव्हिल इंजिनिअरिंग मधील बहुतांश विद्यार्थ्यांनी स्वतःचे उद्योग-व्यवसाय सुरू केलेले असून त्यांच्या माध्यमातूनही अनेक विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झालेल्या आहेत अशी माहिती विभागप्रमुख प्रा.प्रवीण सातपुते यांनी दिली.
समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स (बी सी एस ) विभाग*
प्रज्ञा मुंडे-सर्वत्र टेक्नॉलॉजी सायली भंडारी-टेक महिंद्रा राधा कवडे-टेक महिंद्रा प्रगती बेलोटे-कॉग्निझंट टेक्नॉलॉजी वैभव गांजवे-एम्प्रेस इस प्रा.लि आकाश कानडे-कॉग्निझंट टेक्नॉलॉजी
आकांक्षा जाधव-कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी
या विद्यार्थ्यांना प्रतिवार्षिक ४ लाखाचे पॅकेज देण्यात येणार असल्याचे विभागप्रमुख प्रा.अमोल काळे यांनी सांगितले.
संभाषण कौशल्य,सॉफ्ट स्किल,जावा व फुल स्टॅक डेव्हलपर मधील तांत्रिक ज्ञान व तत्सम सॉफ्टवेअर विषयीची अद्ययावत माहिती तसेच प्रात्यक्षिक व व्यावहारिक कौशल्ये या सर्व बाबींचा विचार निवड चाचणीमध्ये केला जातो.
समर्थ शैक्षणिक संकुलामध्ये प्रशिक्षण व प्लेसमेंट उपक्रम नेहमी सातत्याने राबवले जातात.त्यामध्ये सॉफ्ट स्किल,संभाषण कौशल्ये,मुलाखतीच्या विविध कार्यशाळा,तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम,औद्योगिक सहल,व्याख्यानमाला,नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रॅक्टिकल यांसारखे कार्यक्रम इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट सेल मार्फत आयोजित केले जातात.त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानात भर पडते.म्हणूनच समर्थ चे विद्यार्थी कॉग्निझंट,कॅपजेमिनी,डाटा मेटिका,टेक महिंद्रा,टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस(टी सी एस),रिव्हेचर,व्हर्च्युसा,अकसेंचर,बजाज फायनान्स,एल अँड टी डिफेन्स,एन एस डी एल,साधव ऑफशोअर इंजिनिअरिंग,बी जी शिर्के प्रा.लि.,शिकवाणी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स पुणे,मळगंगा कन्स्ट्रक्शन,टाटा कन्सलटिंग इंजिनिअर्स लि.मुंबई,दि केला कोटिंग,श्री बालाजी कन्स्ट्रक्शन मुंबई,श्री बेल्हेकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.रांजणगाव,एमपायर इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा.लि.मुंबई,एस डी पी एल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि.पुणे,श्रुष्टी इन्फ्रास्ट्रक्चर एल एल पी रायगड,बजाज ऑटो लि. पुणे,बडवे इंजिनिअरिंग प्रा.लि.,जॉन डिअर प्रा.लि.शिक्रापूर,अरसेलर मित्तल निपॉन स्टील पुणे,व्हिनसन इको एनर्जी प्रा.लि.
अँफेनॉल इंटर कनेक्ट इंडिया प्रा.लि.,जेबिल सर्किट इंडिया प्रा.लि.,बजाज ऑटो यांसारख्या नामवंत कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर काम करत आहेत अशी माहिती प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी दिली.
समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) येथील ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या मार्फत या वर्षी विविध कंपन्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३५ पर्यंत पोहोचली असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवून नोकरीच्या अनेकविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील असल्याचे संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी सांगितले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,प्राचार्य राजीव सावंत,डॉ.लक्ष्मण घोलप,डॉ.अनिल पाटील,प्रा.अनिल कपिले यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सदर उपक्रमासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.भूषण बोऱ्हाडे,प्रा.अमोल भोर,प्रा.अमोल काळे,सर्व विभागप्रमुख यांनी विशेष परिश्रम घेतले.