समर्थ लॉ कॉलेज” ला बार कौन्सिल ऑफ इंडियाची मिळाली मान्यता

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून महाविद्यालय होणार सुरू

 

 

 

बेल्हे -( दि १२) प्रतिनिधी

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ लॉ कॉलेज,बेल्हे (बांगरवाडी) या विधी महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून बी.ए.एल.एल.बी. हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करण्यास बार कौन्सिल ऑफ इंडिया यांनी नुकतीच परवानगी दिली आहे अशी माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.

समर्थ लॉ कॉलेज या पदवी विधी महाविद्यालयास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची संलग्नता प्राप्त झालेली असून महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण संचालनालय व उच्च तंत्र शिक्षण मंत्रालय मुंबई,महाराष्ट्र शासन यांची परवानगी मिळालेली आहे.बी.ए.एल.एल.बी. हा पाच वर्षाचा अभ्यासक्रम असून इयत्ता १२ वी नंतर कला,वाणिज्य व विज्ञान कोणत्याही शाखेचा विद्यार्थी जो सीईटी उत्तीर्ण झालेला आहे तो या अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी पात्र आहे.शासकीय प्रवेश प्रक्रियेद्वारे सीईटी सेल मार्फत या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.हे विधी महाविद्यालय सुरू झाल्याने जुन्नर, आंबेगाव,शिरूर,पारनेर,अकोले या परिसरातील पालकांची फार मोठी सोय होणार आहे.तसेच जुन्नर तालुक्यातील हे पहिलेच महाविद्यालय असणार यायचे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप म्हणाले.या विधी महाविद्यालयामध्ये मुटकोर्ट,उच्च दर्जाचे ग्रंथालय,संगणक विभाग,सेमिनार हॉल व वर्ग खोल्या,ई-लायब्ररी,भव्य क्रीडांगणे,सर्व प्रमुख मार्गावर बस सेवा,देशी-विदेशी जर्नल्स,विधी कायद्याशी संबधीत पुस्तके,लीगल एड सेन्टर इत्यादी साठी आवश्यक त्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यात आलेली आहे.अनुभवी प्राध्यापक,मुला- मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे,प्रशस्त क्रीडांगणे,सर्व प्रमुख मार्गावरून बस सुविधा इ. सुविधा विद्यार्थ्यांसाठी संकुलात उपलब्ध आहेत.विद्यार्थ्यांना एका चांगल्या वातावरणा मध्ये कायद्याची पदवी प्राप्त करण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने मिळणार आहे.या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप -८७८८५०१९०९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे.

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close