समर्थ संकुलात टॅफे ट्रॅक्टर्स कंपनी च्या विस्तारित कक्षाचे उदघाटन

बेल्हे -( दि २४) प्रतिनिधी

समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स, बेल्हे येथील शैक्षणिक संकुलात टॅफे(ट्रॅक्टर्स अँड फार्म इक्विपमेंट लिमिटेड) या ट्रॅक्टर कंपनीच्या विस्तारीत कक्षाचे नुकतेच उदघाटन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली

समर्थ शिक्षण संस्थेबरोबर करार करून निर्माण केलेले देशातील पहिले व एकमेव असे हे केंद्र असल्याचे संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सांगितले.या केंद्राच्या विस्तारित कक्षाचे उदघाटन टॅफे च्या कस्टमर सपोर्ट चे राष्ट्रीय उपाध्यक्ष पी.एस. दिनेश यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी टॅफे विभागीय प्रशिक्षण केंद्राच्या महाराष्ट्र राज्याचे सर्व्हिस विभाग प्रमुख गणेशन विजयन,एरिया मॅनेजर हेमंत वंजारी,प्रशिक्षण समन्वयक शशिकांत पांडे,संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,एम बी ए चे प्रा.राजीव सावंत,इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील,बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,आय टी आय चे प्राचार्य पांडुरंग हाडवळे,फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,डॉ.सुभाष कुंभार,गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांशी थेट संपर्क आणि सुसंवाद अशा प्रकारच्या प्रशिक्षण केंद्रांमधून चांगल्या रीतीने होतो.इंडस्ट्री आणि इन्स्टिट्युट यामध्ये वैविध्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख तांत्रिक ज्ञानाची व नवनवीन तंत्रज्ञानाची देवाण घेवाण होणे अत्यंत गरजेचे आहे.सदर केंद्रामध्ये कंपनीच्या वतीने अत्याधुनिक यंत्र सामुग्री ने युक्त प्रयोगशाळा इंजिन व गियर बॉक्स मॉडेल्स ट्रान्समिशन सिस्टीम इ.ची पाहणी करून याबाबत टॅफेच्या अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले पी. एस. दिनेश म्हणाले की विद्यार्थ्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे.लवचिकता आणि दृष्टिकोन.कोणत्याही परिस्थितीत स्वतःला जुळवून घेण्यासाठी लवचिकता म्हणजेच flexibility आत्मसात केली पाहिजे.कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन यशाकडे घेऊन जातो.एखाद्या विषया बद्दलचे सखोल ज्ञान जगाच्या बाजारात विद्यार्थ्यांना तारून नेते.सैद्धांतिक ज्ञानाबरोबर प्रात्यक्षिक आणि व्यावहारिक ज्ञान मिळवणे फार महत्वाचे आहे.ट्रॅक्टर मेकॅनिक,डिझेल मेकॅनिक त्याचबरोबर डिप्लोमा व डिग्री इंजिनिअरिंग मेकॅनिकल शिकणाऱ्या संकुलातील विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. विद्यार्थ्यांसाठी टॅफे च्या माध्यमातून दिले गेलेले अधिकचे प्रशिक्षण व्यवसायाभिमुख असून भविष्यात अनेक नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत.तसेच शेती,अवजारे यांच्यामध्ये होणारे नवनवीन तंत्रयुक्त बदल या टॅफे प्रशिक्षण केंद्रामध्ये शिकायला मिळणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.टॅफे मध्ये दिले जाणारे प्रशिक्षण हे महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी असल्याचे विजयन यांनी सांगितले.प्राचार्य पांडुरंग हाडवळे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close