एक रक्तदान आपल्या जिवलगांसाठी – वाजगे आळी गणेशोत्सव मंडळाचा अनोखा उपक्रम

विक्रांत मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ४७७ जणांचे रक्तदान

नारायणगाव ( दि १४) किरण वाजगे

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपल्या जवळची अनेक माणसे गतप्राण झाली. याच अनुषंगाने समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उद्देशाने नारायणगाव तालुका जुन्नर येथील श्री गणेशोत्सव मंडळ वाजगे आळी तसेच विक्रांत क्रीडा मंडळ, विक्रांत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोरोणा महामारीमुळे गतप्राण झालेल्या आप्तस्वकीयांच्या स्मरणार्थ सोमवार दि. १३ रोजी नारायणगाव येथील महावीर भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. पुणे येथील लोकमान्य ब्लड बँकेच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले. या शिबिरात एकूण ४७७ जणांनी रक्तदान केले. यानिमित्ताने पत्रकार अतुल परदेशी यांनी २७ व्या वेळी, ज्येष्ठ शिवसैनिक अशोक जंगम यांनी ३५ व्या वेळी तर किरण वाजगे यांनी ३९ व्या वेळी रक्तदान केले.

या शिबिराला विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर, भाजपच्या नेत्या व जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, नियोजन मंडळाचे सदस्य विकास दरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, युवा नेते अमित बेनके, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सरपंच राजेंद्र मेहेर, सरपंच योगेश पाटे, विघ्नहरचे संचालक संतोष नाना खैरे उपसरपंच माया डोंगरे, पुष्पाताई आहेर, उद्योजक संजय वारुळे, पोलीस निरीक्षक विलास देशपांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, डॉ वर्षा गुंजाळ, अभय कोठारी अशोक गांधी, स्वप्निल भनसाळी, पप्पू चोरडिया आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विक्रांत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष वाजगे, मुकेश वाजगे, सुरज वाजगे, हर्षल वाजगे, सुजित डोंगरे, नीलेश गोरडे, अनिकेत वाजगे, गणेश वाजगे, पप्पू सोलाट, करण परदेशी, अतुल वाजगे आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

=======================================
चौकट
शिबिरात एकूण ४७७ जणांनी रक्तदान केले यानिमित्ताने पत्रकार अतुल परदेशी यांनी २७ व्या वेळी ज्येष्ठ शिवसैनिक अशोक जंगम यांनी ३५ व्या वेळी तर किरण वाजगे यांनी ३९ व्या वेळी रक्तदान केले आहे त्यांनी केलेल्या विक्रमी रक्तदानाबद्दल त्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close