आंबेगाव तालुका पोलिस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रभाकर दाभाडे यांची निवड

मंचर -( दि १४) प्रतिनिधी

आंबेगाव तालुका पोलिस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी देवगावचे पोलिस पाटील प्रभाकर दाभाडे यांची निवड झाली आहे
आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथील पोलिस पाटील संघटनेचा मेळावा नुकताच संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य एस आर शिंदे महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादा पाटील काळभोर पश्चिम महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष गोरक्षनाथ नवले पाटील मावळते तालुका अध्यक्ष रवींद्र पाटील महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा त्रुप्ती मांडेकर राज्य सदस्या आणिता वाजे सचिव बबुशा वाघ प्रकाश वाघ पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आंबेगाव पोलिस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल प्रभाकर दाभाडे यांचा एस आर शिंदे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला दाभाडे यांची निवड झाल्याबद्दल तालुक्यातील अनेक संस्थांनी आणि मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे
पोलिस पाटलांना प्रशासकीय काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यामुळे यापुढील काळात पोलिस पाटलांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण कायमच प्रयत्नशील राहू असे नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रभाकर दाभाडे यांनी सांगितले

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close