स्वराज्यभुमी प्रतिष्ठान व आंबवडे प्रीमियमच्यावतीने आंबवडे येथे विक्रमी रक्तदान करुन शिवभक्तांनी जोपासलं रक्ताचं नातं

भोर (दि १४) प्रतिनिधी

स्वराज्यभुमी प्रतीष्ठाण आणि आंबवडे प्रिमियर लिग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबीरामधे सहाशेहून आधिक लोकांनी सहभाग नोंदवला.भोर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच एका दिवसात तब्बल १२२ बॅाग रक्त संकलन झाले तेही ग्रामीण भागात रक्तदान शिबीर व आरोग्य तपासणीला लोकांनी प्रचंड प्रतीसाद दिला आरोग्य तपासणीमधे .ECG /हिमोग्लोबीन /रक्तगट तपासणी करण्यात आली याबरोबर नेत्रतपासणी शिबीरही आयोजित केले होते

पाठीमागील आठवड्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या कोविड लसीकरणामुळे रक्तदान करता आले नाही याची खंत अनेकांनी बोलून दाखवली संघटनेनी प्रत्येक रक्तदात्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून प्रत्येक रक्तदात्यास एक वर्षासाठी ५ लाख रु किमतीचा आपघाती विमा एक दिला गेला तसेच हर्ष फाऊंडेशन कडून रक्तदात्यांना रक्ताची व प्लाझ्माची गरज भासल्यास उपलब्ध करुन देण्याची हमी देण्यात आली. सदर शिबीराला अनेक *सामाजिक संस्था, राजकिय, सामाजिक, व्यावसायीक मान्यवर उपस्थित राहिले त्यांनी या उपक्रमांचे भरभरुन कौतुक केले.आणि शिवभक्तांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या

त्यामध्ये उल्लेखनीय अस ज्यांच्यामुळे हे सर्व शक्य झालं असे आमचे मार्गदशक आप्पासाहेब घोरपडे आणि हर्ष फाऊंडेशन, सिद्धिविनायक हॉस्पिटल सर्व टीम, सेवा सदन नेत्रालाय मिरज सांगली ग्रामपंचायत आंबवडे श्री नागेश्वर विद्यालय आंबवडे,प्राथमिक आरोग्य केंद्र आंबवडे भोर तालुका पत्रकार संघटना,मार्तंड देवस्थान जेजुरी, सकल मराठा भोर, कर्मयोगी प्रतिष्ठाण धनकवडी पुणे भोर तालुका प्रहार अपंग संघटना, सह्याद्री रेस्क्यू टीम, संगणक परिचालक संघटना, मोरया प्रतिष्ठान कारी, मावळा प्रतिष्ठान, श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठान, संकल्प प्रतिष्ठान, सी एम एस ग्रुप खंडाळा आदि संघटना उपस्थित होत्या

आंबवडे प्रमियर लिगचे सर्व कार्यकर्ते खेळाडू.ग्रामस्थ मंडळ आंबवडे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला स्वराज्यभुमी प्रतीष्ठाणचे सर्व शिवभक्त उपस्थीत होते
रक्तदान व आरोग्य शिबिरामध्ये दिवसभरात जवळपास ६००लोक सहभागी झाले सर्वांचा उल्लेख करणे शक्य नाही तरी आपण आपला अनमोल वेळ देउन रक्तदान केल्या बद्दल *स्वराज्यभूमी प्रतिष्टान* आपले आभारी आहे

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close