समता गणेश मंडळामुळेच समता,बंधुता आणि एकता टिकून – सखाराम गाडेकर

राजुरी -( दि १३) प्रतिनिधी

समता गणेश मंडळ राजुरी इंदिरानगर येथील गणेश मंडळ या वर्षी ३० व्या वर्षात पदार्पण करत आहे.कोरोना जन्य परिस्थितीत शासनाचे सर्व नियम पाळून सुरक्षित अंतर तसेच सॅनिटायझर चा वापर करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जात आहे
सन १९९२ साली सर्वांनी एकत्र येऊन समता गणेश मंडळाची स्थापना केली.नावाप्रमाणेच समतेचा संदेश देणाऱ्या या मंडळामध्ये सर्वच जाती,धर्माचे,पंथाचे लोक त्याचप्रमाणे बाराबलुतेदार एकत्रितपणे दरवर्षी श्री गणेशाची मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने पूजा अर्चा करतात.दरवर्षी सामाजिक धार्मिक सांस्कृतिक,नैसर्गिक,राजकीय,उपदेशपर लोककलेवर आधारित पारंपरिक,लोकजागृतीपर विषयावर आधारित असे नवनवीन देखावे हे मंडळ साकारण्याचा प्रयत्न करते
यापूर्वीही नेहरू युवा केंद्र पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धा,निबंध स्पर्धा आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते
विघ्नहर्त्या गणरायाचे मनोभावे पूजन करताना सामाजिक जाणिवांचे भान बाळगणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आयोजित स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सपट चहा व दैनिक गावकरी या वृत्तसमूहाने समता गणेश मंडळ राजुरी यांना विशेष प्रमाणपत्र देऊन गौरविले होते
मंडळाची स्थापना झाली तेव्हा १९९२ च्या काळात गणेशाची मूर्ती ही एक पोत्याच्या शेडमध्येच बसविली जात होती सन २०११ मध्ये पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच माऊलीशेठ शेळके माजी उपसरपंच एम डी घंगाळे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत सभापती जयंत रघतवान यांच्या निधीतून मंडळासाठी समाजमंदिर बांधण्यात आले त्यासाठी भगवान औटी यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला
स्थापनेपासून ते आजपर्यंत गरुड,डायनासोर,नारळ गडवा हनुमान पर्णकुटी,ससा,मिनी जहाज,बदक,डोंगर,मोर अशा अनेक कलाकृतींनी युक्त असे देखावे सादर केलेले आहेत
सन १९९८ मध्ये मंडळ नोंदणीकृत करण्यात आले.माजी सभापती दिपक शेठ औटी यांच्या प्रयत्नातून भजनी साहित्य,सतरंज्या व स्पीकर सेट यांचे वितरण करण्यात आले होते
तसेच या पूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.स्नेहल ताई वल्लभ शेळके यांच्या प्रयत्नातून मंडळाला पारंपरिक वाद्य ढोल व ताशांचे वितरण करण्यात आलेले होते
मागील वर्षी मा.आमदार शरद दादा सोनवणे यांच्या दातृत्वातून स्वखर्चाने गणपतीचे शेड उभारण्यासाठी २.५ लक्ष रु.चा निधी मंजूर होऊन काम पूर्ण देखील झालेले आहे.त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सभामंडपसाठी फरशी देखील बसवून देण्यात आलेली आहे.दरवर्षी येथील भाविक या गणेशाला इप्सित कार्य पार पडण्यासाठी नवस करतात व हा गणेश नवसाला पावतो.मनात भाव शुद्ध असेल तर गणपती शुभ फळ देतो अशी याची ख्याती आहे मंडळाच्या या यशस्वी वाटचालीत अध्यक्ष सखाराम गाडेकर,उपाध्यक्ष सिताराम जेडगुले,सचिव भगवान औटी,खजिनदार दिनेश बनकर,सुखदेव पवार,ज्ञानेश्वर गाडेकर,सुरेश गायकवाड,शिवाजी आल्हाटअनिल बनकर,मनोहर गुळवे,प्रदीप गाडेकर,रविराज गाडगे,ऋषिकेश पवार,नामदेव पवार,राहुल कडलाक,अक्षय शिरतर,सोमनाथ शिरतर,रोहन पवार,रोहित पवार,अनिकेत गुळवे,अभिषेक गुळवे,मयूर चव्हाण,प्रसाद गोसावी,हेमंत गोसावी,अतुल गोरे,आकाश गुळवे,आदेश गुळवे,तेजस गायकवाड,मंगेश गायकवाड,सचिन भालेराव,निलेश गाडेकर,गणेश गाडेकर,मंगेश गाडेकर,विजू गुळवे,विशाल जेडगुले,स्वप्नील जेडगुले,करण औटी,दर्शन मंडले,प्रसाद माकरे, अभिषेक चव्हाण,प्रतीक रायकर,बबलू बनकर,अक्षय गाडेकर,अजय गाडेकर,प्रकाश गाडेकर,साहिल बनकर,दत्तात्रय जाधव,ज्ञानेश्वर जाधव या सर्व तरुण वर्गाचा सक्रिय सहभाग व मोलाचा वाटा आहे

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close