विद्यार्थ्यांनी शेतीपूरक प्रकल्प बनवावेत:कृषितज्ज्ञ मंगेश भास्कर

बेल्हे -( दि ३१) प्रतिनिधी

समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) येथे नुकतीच कृषितज्ज्ञ मंगेश भास्कर यांनी भेट दिली.कृषितज्ज्ञ या नात्याने पाहणी करताना अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांनी शेतीपूरक गोष्टीवर भर देऊन समाजासाठी आपले योगदान द्यावे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.
कृषी क्षेत्रामध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दैनंदिन जीवनात अनेकविध समस्यांना व अडचणींना सामोरे जावे लागते.त्या समस्यांवर प्रभावी उपाय योजना करणारे,कमी खर्चात व वास्तववादी स्वरूपातील प्रकल्प अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांनी तयार करावेत जेणेकरून त्याचा फायदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होईल तसेच प्रतिवर्षी समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थ्यांना कृषीपूरक प्रकल्प विषयी विशेष कार्यशाळा चे आयोजन करणार असल्याचे मंगेश भास्कर यांनी सांगितले.
संकुलातील विद्यार्थ्यांनी यापूर्वी तयार केलेले प्रकल्प व त्याविषयी माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.आमचे विद्यार्थी हे मेहनती व कष्टाळू असून शेतकऱ्यांच्या गरजा व परिस्थिती ला पूरक असे शेंगा फोडणी यंत्र,आटोमॅटिक टायर फिटिंग,मल्चिंग पेपर अंथरणारे यंत्र,सुबक बी पेरणी यंत्र,बहुपर्यायी शेतीची कामे करणारे उपकरण,नारळ काढणारे यंत्र,पोल्ट्रीतील विविध उपकरणे,अवजड वस्तूंची पहिल्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर नेणारे मॉडेल यांसारख्या अनेक प्रकल्पांची माहिती यावेळी वल्लभ शेळके यांनी उपस्थितांना दिली.
यावेळी प्रगतिशील बागायतदार व शेती तज्ञ बाबाजी शेठ नेहरकर,मारुतीशेठ बोरचटे,उपाध्यक्ष अभिनव द्राक्ष उत्पादक संघ,भूषण औटी,संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,गुंजाळवाडी गावचे सरपंच लहुशेठ गुंजाळ,प्रशांत गावडे,सुरेश शेठ बोरचटे आदी मान्यवर उपस्थित होते.वल्लभ शेळके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close