पुणे विद्यापीठाचे कुलगुरूं डाॅ करमळकर यांनी दिली समर्थ शैक्षणिक संकुलास सदिच्छा भेट

बेल्हे -( दि २१) प्रतिनिधी

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे या महाविद्यालयास नुकतीच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा.प्रा.डॉ.नितीन करमळकर यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी कुलगुरुं समवेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.मनोहर चासकर,तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा.डॉ.आदित्य अभ्यंकर,स्कुल ऑफ फिजीकल सायन्सेस चे संचालक डॉ.सुरेश गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.
समर्थ शैक्षणिक संकुलातील टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रॅम(Toyota-TEP) ला भेट देऊन तेथील अद्ययावत तंत्रज्ञानाने युक्त प्रयोगशाळा व यंत्रसामग्री यांची पाहणी केली व मार्गदर्शन केले.इंजिनिअरिंग विभागातील टाटा मोटर्स च्या विभागीय प्रशिक्षण केंद्रामध्ये असलेली विविध प्रकारची डिझेल इंजिन,पेट्रोल इंजिन व कट सेक्शन मॉडेल,बॅटरी यांची पाहणी केली.
त्याचबरोबर ब्रिजस्टोन टायर ट्रेनिंग सेंटर मधील टायर्स चे प्रकार,झीज होण्याची कारणे व उपाय याबाबतची विस्तृत माहिती प्रॅक्टिकल च्या साहाय्याने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेचे कौतुक केले.
याप्रसंगी संकुलातील गेस्ट हाऊस परिसरात कुलगुरूंच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तदनंतर समर्थ क्रीडा प्रबोधिनी मधील नूतन जिम चे उदघाटन कुलगुरूंच्या शुभ हस्ते करण्यात आले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात कुलगुरूंनी मार्गदर्शन केले.जुने आणि नवे या दोघांची सांगड घालून मल्टि डिसीप्लिनरी,इंटर डिसीप्लिनरी तसेच सर्वसमावेशक,अखंड,चौकस बुद्धीचे,नव उपक्रमशीलता,लवचिकता असणारे शिक्षण या नवीन राष्ट्रीय धोरणात अपेक्षित आहे.
भारतीय शैक्षणिक संस्कृतीची महती विशद करत चरक संहिता पासून तर कोव्हीड काळातील व्हेंटिलेटर व इतर गोष्टीच्या आवश्यकतेला पूरक असणारे उपाय अनेक पौराणिक,तत्कालीन व सद्यस्थितीतील दाखले देत स्पष्ट केले.तसेच आजच्या इंडस्ट्री 4.04 ला उपयुक्त असणारे अभ्यासक्रम नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये कशा पद्धतीने महत्वाचे आहे याबद्दल विस्तृत माहिती दिली.
या संकुलात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी देत असलेले रोजगाराभिमुख शिक्षण त्याचप्रमाणे कार्यशाळा,वेबिनार,सेमिनार,औद्योगिक सहली,इंडस्ट्री इन्स्टिट्यूट सामंजस्य करार,ट्रेनिंग प्रोग्रॅम हे सर्व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शी सुसंगत असून काळाची पावले ओळखून त्यादृष्टीने आपण करत असलेली अंमलबजावणी कौतुकास्पद असल्याचे यावेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर म्हणाले.
विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.मनोहर चासकर म्हणाले की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर विविध उद्योग समूहांबरोबर सामंजस्य करार केले जात आहेत.नामवंत संस्थांबरोबर आणि उद्योग समूहांबरोबर शैक्षणिक करार केले जात आहेत.त्यायोगे सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी अधिकाधिक कौशल्यभिमुख होतील आणि त्यांना नोकरी व व्यवसायाच्या चांगल्या संधी निर्माण होतील.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके व विश्वस्त वल्लभ शेळके उपस्थित होते.कुलगुरू व मान्यवरांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तसेच आजपर्यंतच्या शैक्षणिक योगदानाबद्दल समर्थ संकुलातील सर्व प्राचार्यांचा कुलगुरूंच्या हस्ते सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मान करण्यात आला.मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा.सचिन शेळके यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कुलगुरूंनी संस्था व पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी तर आभार डॉ.अनिल पाटील यांनी मानले

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close