समर्थ शैक्षणिक संकुलात माजी सैनिकांचा सन्मानसोहळा

बेल्हे -( दि १५) प्रतिनिधी

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आझादी का अमृतमहोत्सव निमित्त “उत्सव स्वातंत्र्याचा,सन्मान माजी सैनिकांचा” या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,जुन्नर तालुका माजी सैनिक संघाचे अध्यक्ष देविदास भुजबळ,उपाध्यक्ष दिलीप आरोटे,सचिव रामदास मेहेर,कॅप्टन महादेव हाडवळे,लेफ्टनंट उमेश अवचट,निवृत्त पोलीस अधिकारी गोपीनाथ कसाळ,गोपीनाथ कुटे बाळासाहेब मूळे सुधीर खेबडे चंद्रकांत मूळे गोपीनाथ हाडवळे बबन कुऱ्हाडे विनायक औटी सुभाष काकडे सतीश भुजबळ नवनाथ गाढवे पंढरीनाथ घोटकर एकनाथ वाजगे प्राचार्य जी के औटी सर दत्तू नाना कणसे रंगनाथ पाटील औटी रामदास औटी,आर्मी नेव्ही,एयर फोर्स मधील सेवानिवृत्त अधिकारी व सैनिक तसेच अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल कपिले,एम बी ए चे प्राचार्य राजीव सावंत,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले उपस्थित होते
माजी सैनिकांबद्दल कृतज्ञतेच्या भावनेतून व आदराप्रति दरवर्षी समर्थ संकुलात या स्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा खरंतर प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कोरली जायला हवी अशी आहे.अभूतपूर्व साहस,जाज्ज्वल्य देशाभिमान, दुर्दम्य इच्छाशक्ती, नि:सीम धैर्य आणि कठोर निर्धार यांच्या बळावर एकीकडे अपुरा शस्त्रसाठा, प्रतिकूल निसर्ग आणि दुसरीकडे अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती असताना त्यांवर मात करत,आपल्या जिवाची तमा न बाळगता शरीरातल्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढणारे भारतीय सैन्याचे वीर जवान देशाची खरी संपत्ती आहे
*शूरवीर जवानांच्या अपार शौर्याची कहाणी मांडताना सर्वसामान्य माणसामध्ये व सैनिकांमध्ये एक सुंदर भावबंध निर्माण करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेऊन आपल्या शिक्षणाचा उपयोग देशसेवेसाठी करावा असे प्रतिपादन जुन्नर तालुका माजी सैनिक संघाचे अध्यक्ष दिलीप भुजबळ यांनी केले.*
*सैनिकांप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीवदेखील तितकीच महत्वाची आहे.सैन्यातील शिस्त आणि नियम याबाबत बोलताना गोपीनाथ कुटे म्हणाले की,आपले वीरयोद्धे सार्‍या देशाची जबाबदारी घेऊन देदीप्यमान देशप्रेमाच्या,कर्तव्याच्या भावनेतून मी माझ्या देशाची सेवा करणार म्हणून तिथे लढतात.हे योद्धे वीरजवान भारताच्या वेगवेगळ्या प्रांतांमधून आलेले असतात.वेगवेगळ्या जातींचे, धर्मांचे,भाषांचे पण त्यांची एकच ओळख ती म्हणजे एक ‘भारतीय’. देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसतहसत आपल्या प्राणांची आहुती देणार्‍या या वीरयोद्ध्यांबद्दल कृतज्ञतेचा भाव ठेऊन त्यांच्याप्रती आदर ठेवावा
आपल्या लष्करी बांधवांना,आपल्या सैनिकांना कोणत्या अवघड परिस्थितीत कशा तर्‍हेच्या कठीण हवामानात किती काळ राहावं लागतं याबाबतचे अनुभव यावेळी माजी सैनिकांनी विशद केले.आपण ज्या ठिकाणी शिकतो,काम करतो त्या ठिकाणी आपापली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडून नियमांचे पालन करणे ही देखील एक देशसेवाच असल्याचे यावेळी सांगितले.आपल्या तिरंग्याची आण, बाण शान ही आताच्या तरुणांच्या हातात आहे.त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले.माजी सैनिकांचे चित्तथरारक अनुभव ऐकताना सर्वांच्या अंगावर शहारे उमटत होते यावेळी सर्व माजी सैनिकांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा.सचिन शेळके,प्रा.दिनेश जाधव,क्रीडा शिक्षक डॉ.राजाराम ढोबळे यांनी केले.
सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी प्रास्ताविक वल्लभ शेळके सर यांनी तर आभार डॉ.लक्ष्मण घोलप यांनी मानले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने ने करण्यात आली

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close