समर्थ शैक्षणिक संकुलात सर्पतज्ञांचे स्नेक बाईट मॅनेजमेंट या विषयावर मार्गदर्शन

बेल्हे -( दि १२) प्रतिनिधी

समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ कॅम्पस या यु ट्यूब चॅनेल वर “स्नेक बाईट मॅनेजमेंट” या विषयावर नुकतेच मार्गदर्शन करण्यात आले.नारायणगाव येथील विघ्नहर नर्सिंग होम व जुन्नर तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन चे अध्यक्ष डॉ.सदानंद राऊत यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पुणे जिल्हा व परिसरात आढळणारे घोणस,मण्यार,नाग,धामण इ विषारी,बिन विषारी आणि तत्सम प्रजातीतील विविध सापांची विस्तृत आणि सखोल माहिती दिली.साप चावल्यानंतर प्रथम त्या व्यक्तीला डॉक्टर कडे घेऊन जाणे आणि कोणता साप आहे त्याचा शक्य असेल तर फोटो काढून डॉक्टरांना दाखवणे गरजेचे आहे.कारण त्या सापाच्या जातीनुसार रुग्णावर इलाज करणे सोपे होते असे डॉ.राऊत यांनी सांगितले.अजूनही बऱ्याच ठिकाणी साप चावल्यानंतर रुग्णाला मांत्रिक भोंदूबुवा यांचे कडे नेले जाते.उपचारा अभावी, अंधश्रद्धेपोटी रुग्ण अशा वेळी दगावण्याची शक्यता असते.सर्पदंश लक्षणे,उपचारपद्धती माहिती करून घेणे महत्वाचे आहे असे डॉ.राऊत यांनी सांगितले.
यावेळी संस्थेचे सचिव विवेक शेळके विश्वस्त वल्लभ शेळके प्रा.प्रवीण ताजने प्रा.तानाजी वामन सर्व संस्थांचे प्राचार्य उपस्थित होते.वेबिनारचे सूत्रसंचालन प्रा.भूषण बोऱ्हाडे यांनी तर आभार प्रा.रतीलाल बाबेल यांनी मानले.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close