समर्थ अभियांत्रिकीच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड

बेल्हे -( दि २५ जुलै ) प्रतिनिधी

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बेल्हे(बांगरवाडी) येथील सिव्हील इंजिनिअरिंग मधील विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी दिली.
सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये शिकत असलेल्या सुशांत हाडवळे व जिंतेंद्र राठोर यांची मुंबई येथील दि किला स्ट्रक्चर रिपेअर्स अँड कोटींग प्रा लि या कंपनी मध्ये ट्रेनी इंजिनियर म्हणून निवड झाल्याची व २ ते ३ लाखाचे वार्षिक पॅकेज सदर विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे विभागप्रमुख प्रा.प्रवीण सातपुते यांनी सांगितले.
तसेच राहुल वाळुंज या विद्यार्थ्याची क्वालिटी बिल्डकॉन मध्ये ट्रेनी इंजिनियर म्हणून निवड झाली.त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे:
सुजित गायकवाड-बी जे शिर्के प्रा.लि मुंबई प्रशांत कणसे-एन सी सी सी एल,मुंबई सागर शिंदे-युनिकॉन डेव्हलपर्स,संगमनेर
गणेश जाधव-मिलेनियम इंजिनिअरिंग अँड काँट्रॅक्टर्स मुंबई श्रीकांत कोकणे-सीना बिल्डकॉन,अहमदनगर ऋषिकेश फराटे-सी जिओ सर्व्हे प्रा.लि. मुंबई प्रियांका सातपुते-युनिकॉन डेव्हलपर्स,संगमनेर सुशांत पवार-आर एस इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. पुणे अनिकेत बांगर-जितेंद्र सिंग इन्फ्रा प्रा.लि पुणे प्रियांका गंधाक्ते -मातोश्री बिल्डकॉन पारनेर
बांधकामाचे नियोजन व व्यवस्थापन करत असताना विचारात घेतले जाणारे वेगवेगळे घटक,विविध प्रकारचे बांधकाम कौशल्य त्याचप्रमाणे मेंटेनन्स साठी करण्यात येणारी उपाययोजना या सर्वांचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे निवड करताना कंपनीचे व्यवस्थापक विकास महाले यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी मेहनत,कष्ट व सातत्यपूर्ण अभ्यास या जोरावर कोरोना काळातही आपल्या कौशल्याच्या जोरावर विविध ठिकाणी कार्यरत आहेत असे ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाचे प्रा.अमोल भोर यांनी सांगितले.
सदर विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके सर यांनी विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close