समर्थ अभियांत्रिकीच्या चौदा विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड

बेल्हे -( दि १९ जुलै) प्रतिनिधी

बेल्हे (बांगरवाडी) येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेमध्ये शिकत असलेल्या अंतिम वर्षाच्या १४ विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी दिली
ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेतल्या गेलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या १४ विद्यार्थ्यांची विविध बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली
निवड झालेले विद्यार्थी कंपणीचे नाव व त्यांना मिळालेले वार्षिक पॅकेज समीक्षा गुंजाळ- कॉग्निझंटकंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर (वार्षिक १० लाख ९८ हजाराचे ) प्रगती भोसले -अकसेंचर ( वार्षिक ५ लाख ) समीक्षा साबळे-सीमेन ( ५ लाख) मोनिका जोरी-नोवॅक टेक ( ४ लाख ८० हजार)
किर्ती वळसे-अकसेंचर ( ४ लाख ५० हजाराचे पॅकेज)
तसेच विनायक सरोदे -टाटा कम्युनिकेशन म्हणजेच टीसीएस या नावाजलेल्या कंपनीमध्ये *सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून वार्षिक ३ लाख ५० हजाराचे पॅकेज प्रिया पोखरकर-अटोस मध्ये ३ लाख ५० हजार प्रतीक्षा जाधव-कॅपजेमिनी मध्ये ३ लाख २० हजार साफिया ईनामदार-कॅपजेमिनी मध्ये ३ लाख २० हजार
तेजस हांडे-कॅपजेमिनी मध्ये ३ लाख २० हजार सोनाली भोर-कॅपजेमिनी मध्ये ३ लाख २० हजार अक्षय मांडगे-अटोस मध्ये २ लाख ५० हजार सोनम बांगर-बजाज फायनान्स मध्ये २ लाख ४० हजार अक्षदा गागरे-व्हेंसेंट सिस्टीम प्रा.लि पुणे मध्ये २ लाख २० हजार
सदर विद्यार्थ्यांच्या मुलाखती दोन टप्प्यात घेण्यात आल्या.पहिला टप्पा ऑनलाईन लेखी परीक्षा व कल चाचणी तर दुसऱ्या टप्प्यात तांत्रिक कौशल्य,सांघिक चर्चा व वैयक्तिक ऑनलाईन मुलाखती घेण्यात आल्या.
संभाषण कौशल्य,सॉफ्ट स्किल,जावा व फुल स्टॅक डेव्हलपर मधील तांत्रिक ज्ञान व तत्सम सॉफ्टवेअर विषयीची अद्ययावत माहिती तसेच प्रात्यक्षिक व व्यावहारिक कौशल्ये या सर्व बाबींचा विचार निवड चाचणीमध्ये केलेला आहे.
औद्योगिक क्षेत्रामध्ये पदवी अभियांत्रिकी क्षेत्रातील मुलांना नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध होत आहेत.रोजगाराच्या अनेक संधी तुमची वाट पाहत आहेत त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून स्वतःला अपडेट ठेवावे असे यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.सौ.सोनाली फुलसुंदर व स्वप्नील पाटील यांचे सहकार्य लाभले.सदर उपक्रमासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.भूषण बोऱ्हाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close