समर्थ पॉलिटेक्निक मध्ये मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अभ्यासक्रमास मान्यता

बेल्हे -:(दि ८ जुलै) प्रतिनिधी

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे(बांगरवाडी) येथील समर्थ पॉलिटेक्निक या तंत्रनिकेतन महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांची परवानगी प्राप्त झाली आहे अशी माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.
सदर अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता प्रथम वर्षासाठी ३० इतकी असणार आहे.तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची सल्लग्नता असणार आहे
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करणारे समर्थ पॉलिटेक्निक हे पहिलेच तंत्रनिकेतन ठरलेले आहे.
मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही अभियांत्रिकीची उदयोन्मुख शाखा असून बदलत्या कालानुरूप हा अभ्यासक्रम सुरू करणे आवश्यक होते नवनवीन तंत्रज्ञानाच्या युगामध्ये या शाखेला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेले आहे या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत रोबोटिक्स मेकॅनिकल इंजिनियरिंग इलेक्ट्रॉनिक्स काॅम्पूटर इंजिनियरिंग टेलिकम्युनिकेशन इंजिनियरिंग सिस्टम इंजिनियरिंग कंट्रोल इंजिनियरिंग इत्यादी विविध शाखां मधील महत्त्वाच्या घटकांचा समावेश केला जातो
ऑटोमोबाईल क्षेत्रात होत असलेले बदल विशेष करून इलेक्ट्रिकल वाहनांची निर्मिती व त्यामुळे या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या व व्यवसायाच्या प्रचंड संधी लक्षात घेता विद्यार्थी व पालकांची सदर अभ्यासक्रम सुरू करण्यास मागणी होती.सदर अभ्यासक्रम सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची फार मोठी सोय होणार आहे.
यापूर्वी समर्थ पॉलिटेक्निकमध्ये सिव्हील इंजिनिअरिंग कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन इंजिनिअरिंग
मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे अभ्यासक्रम यशस्वीपणे सुरू आहेत
त्याचप्रमाणे समर्थ शैक्षणिक संकुलात टाटा मोटर्स चे विभागीय प्रशिक्षण केंद्र,टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रॅम महिंद्रा सी आय इ ट्रेनिंग सेंटर टॅफे ट्रेनिंग सेंटर यांसारखे कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम व त्यामध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक प्रयोग शाळा यामुळे नव्याने सुरू झालेला मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम शिकणारे विद्यार्थी अधिक सक्षम होतील असे प्राचार्य अनिल कपिले म्हणाले.या अभ्यासक्रमाचे प्रवेश शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसार होणार आहेत.
अधिक माहितीसाठी प्रा.अनिल कपिले-९९७०८९९८४७ प्रा.महेंद्र खटाटे- ९५०३८७५३८५ यांच्याशी संपर्क साधावा.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close