शाहू महाराजांचे विचार तरुणांसाठी प्रेरणादायी -डॉ लक्ष्मण घोलप

बेल्हे -: ( दि २६) प्रतिनिधी

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित बेल्हे(बांगरवाडी) येथील शैक्षणिक संकुलात छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.
संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांच्या शुभहस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे फुल व पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.
राजर्षी शाहू महाराजांबद्दल माहिती देताना बी सी एस चे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप म्हणाले की,शाहू महाराजांचे विचार सर्वांना प्रेरणादायी असून त्याचा जीवनात उपयोग करून उत्कर्ष साधावा शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात संगीत चित्रपट चित्रकला लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे कार्य केले.त्यांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला.कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणार्‍या पाटील शाळा,प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षण देणार्‍या, तंत्रे व कौशल्ये शिकवणार्‍या शाळा असेही उपक्रम त्यांनी राबवले.छत्रपती शिवरायांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली.सामाजिक बंधुभाव समता, दलित व उपेक्षित बांधवांचा उध्दार शिक्षण शेती उद्योगधंदे, कला, क्रिडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रामध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य केले.यावेळी उपस्थितांचे प्रा.प्रदीप गाडेकर यांनी आभार मानले.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close