समर्थ कॉलेजला बी बी ए अभ्यासक्रमास शासनाची मान्यता

बेल्हे -:( दि २२जून ) प्रतिनिधी

समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स ,बेल्हे(बांगरवाडी)या वरिष्ठ महाविद्यालयास शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत बॅचलर ऑफ बिजनेस ऍडमिनिस्ट्रेशन(बी बी ए-आय बी) हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास उच्च तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांनी नुकतीच परवानगी दिल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.सदर अभ्यासक्रमास इ १२ वी कला,वाणिज्य व विज्ञान इंग्रजी विषयासह उत्तीर्ण किंवा डिप्लोमा फार्मसी उत्तीर्ण/डिप्लोमा इंजिनिअरिंग(पॉलिटेक्निक) उत्तीर्ण,एम सी व्ही सी उत्तीर्ण असा कोणताही विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतो.सध्याच्या आधुनिक काळामध्ये भारतामध्ये विविध प्रकारच्या बहुराष्ट्रीय कंपन्या आलेल्या आहेत.अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी आवश्यक असणारे वाणिज्य व व्यवस्थापन क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ बी बी ए (आय बी) या अभ्यासक्रमाने तयार होणार आहे.हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अनेक संधी उपलब्ध असून भविष्यात उच्च शिक्षणासाठी एम बी ए मार्केटिंग,फायनान्स,इंटरनॅशनल बिजनेस,ह्युमन रिसोर्स तसेच इतर तत्सम स्पेशलायझेशनसाठी प्रवेश घेऊ शकतो असे प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप यांनी सांगितले.अनेक वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्याविषयी परिसरातील पालकांकडून मागणी होत होती.सदर अभ्यासक्रम सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची फार मोठी सोय होणार आहे.अधिक माहितीसाठी प्रा.अमोल काळे-८३२९५८८९०१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close