ओबीसीचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी महात्मा फुले ब्रिगेड लढणार

आळेफाटा -( दि २२) प्रतिनिधी

महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्य कार्यकारणी ची महत्वाची ऑनलाईन मिटिंग प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय चांबारगे (माळी ) यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष प्रा.रमेशजी सोनवणे,मा.वर्षाजी माळी, पन्नालालजी टाक, प्रदेश सरचिटणीस उत्तमजी गोरे, प्रदेश संपर्क प्रमुख डॉ. धनराजजी देवरे, प्रदेश सोशिअल मीडिया प्रमुख इंजि. प्रज्योतजी फुलसुंदर व राज्य कार्यकारणी पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.
बैठकीत सद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसीचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्यसरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी याबाबत लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
सोबत महात्मा फुले ब्रिगेडचे नवीन पदाधिकारी निवड करणे. मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणे.ओबीसींची जातनिहाय जनगणना करणे. महात्मा फुले यांच्या नावाने सुरु असलेली महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना लाभ घेऊ इच्छित रुग्णांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी कशा पद्धतीने सहकार्य करता येईल याची सविस्तर चर्चा करण्यात आली.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close