खोडद येथील जी एम आर टी आयोजित राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात बेल्हे येथील समर्थ पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

खोडद -:( दि १७) प्रतिनिधी

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त खोडद येथील दरवर्षी होणारे विज्ञान प्रदर्शन हे अखंडित चालू राहावे या साठी या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि शासकीय नियमानुसार या वर्षी एनसीआरए-जीएमआरटी ने ऑनलाइन विज्ञान प्रदर्शन हे इंडियन इन्स्टिटयूट ऑफ नॉलेज (आय.आय.के.) या संस्थेच्या साहाय्याने ग्रोइंग डॉट या मोबाइल आप च्या माध्यमातून ऑनलाइन आयोजित केले होते. विज्ञान प्रदर्शनाचे समारोप एनसीआरए चे संचालक प्रो. यशवंत गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी डॉ. जे.के. सोळंकी यांच्या उपस्तिथीत झाले. या वर्षीच्या ऑनलाइन विज्ञान प्रदर्शनात संपूर्ण देशातील ९ राज्यातून ३३० शाळा महाविद्यालयांनी सहभाग घेऊन सुमारे ६८० विविध प्रयोग व प्रकल्प सहभागी झाले. या प्रकल्पांसोबत जवळजवळ ९०० पेक्षाही जास्त विध्यार्थ्यानी सहभाग घेतला.जीएमआरटी चे ऑनलाइन विज्ञान प्रदर्शन सुमारे ५५००० लोकांनी हे प्रदर्शन पाहिले व १६००० लोकांनी प्रकल्पांना रेटिंग केले.
खोडद येथील जी एम आर टी मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या ऑनलाईन प्रकल्प स्पर्धेत समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे (बांगरवाडी) या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विभागांमध्ये शिकत असलेले मनीष भोर,मानव पटेल,सुमित विश्वासराव,ऋतुज बोऱ्हाडे या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘आर्मी मधील रोबोट’ या प्रकल्पाचा सदर ऑनलाईन विज्ञान प्रदर्शनामध्ये द्वितीय क्रमांक आल्याची माहिती प्राचार्य अनिल कपिले यांनी दिली.
समर्थ पॉलिटेक्निक च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला सदर रोबोट जमिनीतील बॉम्ब शोधण्यासाठी,फायरिंग करण्यासाठी तसेच डोंगरी भाग,चढ उतार वळणे अशा विविध ठिकाणी कार्य करण्यासाठी ‘आर्मी मॅन’ म्हणून अतिशय उपयुक्त असल्याचे प्रकल्प मार्गदर्शक प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर यांनी सांगितले.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्षांमध्ये शिकत असलेल्या अंकिता टेमगिरे,प्रियांका काकडे,काजल टेमगिरे यांनी कोव्हीड पासून सुरक्षित राहण्यासाठी “वायरलेस टेम्परेचर डिटेक्टर फॉर कोव्हीड सेफ्टी” नावाचा प्रकल्प तयार केला आहे.या प्रकल्पाच्या माध्यमातून घर,हॉस्पिटल,शाळा,महाविद्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी कोव्हीड रुग्ण प्राथमिक तपासणी करूनच सदर ठिकाणी प्रवेश मिळतो.आपल्या घराबाहेर हा प्रकल्प ठेवल्यास बाहेरून येणाऱ्या व्यक्तीचे तापमान मोजले जाते ते जर ३७ डिग्री पेक्षा कमी असेल तरच सेफ्टी दरवाजा उघडला जाईल व पुढे लगेचच त्याला सॅनिटाईज केले जाईल.अन्यथा जर तापमान अधिक असेल तर दरवाजा बंदच राहतो.अशा रीतीने कोव्हीड पासून आपला बचाव होतो.या प्रकल्पाला तृतीय क्रमांक मिळाल्याची माहिती प्रा.राहुल जाधव यांनी दिली.
संगणक विभागातील अक्षीत येंध्ये,प्रदीप शेळके,ओंकार भवारी या विद्यार्थ्यांनी लहान मुलांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून बनवलेले “किड्स लर्निंग अप्लिकेशन” या प्रकल्पास उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.या प्रकल्पासाठी प्रा.महेश पोखरकर यांनी मार्गदर्शन केले.
या प्रकल्प स्पर्धेची पाहणी जगभरातून असंख्य लोकांनी केल्याचे जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रा.रतीलाल बाबेल यांनी दिली.ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजा ओळखून या प्रकल्पांचा वापर हा बहुपर्यायी म्हणून करता येतो.
हा प्रकल्प तयार करण्यासाठी सदर विद्यार्थ्यांना प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर,प्रा.संजय कंधारे,प्रा.महेंद्र खटाटे,प्रा.राहुल जाधव,प्रा.महेश पोखरकर,प्रा.विशाल कांबळे यांनी सहकार्य व मार्गदर्शन केले.
या संकुलातील विद्यार्थी नवनवीन समाजाभिमुख प्रकल्प तयार करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा नेहमी प्रयत्न करत असतात त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके व विश्वस्त वल्लभ शेळके यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close