क्राईम

शिवनेरवार्ता

ओतूरमध्ये पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा :मुद्देमाल व रोख रक्कम जप्त
पंधरा जुगा-यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जुन्नर -: शिवनेरवार्ता न्यूज नेटवर्क
 सध्या सुरु असलेल्या संचारबंदी दरम्यान पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ओतूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी जुगार खेळणा-या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पंधराजणांना ताब्यात घेतले तर त्यांच्याकडून ९लाख ३९हजार ३०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
याबाबत मिळालेली माहिती अशी की मंगळवारी ( दि.१२) सकाळी १०वा.चे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे पेट्रोलींग करत असताना त्यांना ओतूर गावच्या हद्दीत ठाकरवाडी येथे बबन शितोळे यांच्या घराच्या शेजारी मोकळ्या जागेत काही लोक एकत्रित बसून तीन पत्ते नावाचा जुगार खेळत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने ओतूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. कांबळे यांना माहिती देऊन त्यांनी आपल्या सहकाा-यांना सोबत घेऊन व दोन पंचांना बोलवून ठाकरवाडी येथे जाऊन बबन शितोळे यांच्या घरा घराच्या अलीकडे गाडी उभी केली असता घराच्या शेजारी आडोशाला जमिनीवर दोन ग्रुप करून बसलेले आढळून आले त्यामधील पहिल्या ग्रुपमधील १) मारुती विठ्ठल तांबे
२) नाशिर इब्राईन मन्यार ३) रमेश वचिष्ठ गोरे ४) रोहन किरण शहा ५) मच्छिंद्र धनलाल चव्हाण ६) सचिन चंद्रकांत भुजबळ ७) बाळासाहेब म्हातारबा कुरकुटे ८) सचिन अर्जुन नलावडे यांची पंचाचे समक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे समोर ५२ पानाचे कॅटचे प्रत्येकी तीन पत्ते व बाकी कॅट मधील उरलेले पत्ते साईडला ठेवलेले व त्याचे समोरील व अंगझडती तील रोख रक्कम ७९ हजार ४१० रुपये मिळून आले तर दुस-या ठिकाणी असलेले १) अतुल रामदास तांबे २) जाकिर बशीर बेपारी ३) अशोक मनोहर गावडे ४)
अजित अशोक फापाळे ५) जीशान नाईक मन्यार ६) शांताराम निवृत्ती नायकोडी ७) बबन रामजी शितोळे यांची पंचांचे समक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे समोर 52 पानांचे कॅट मधील प्रत्येकी तीनपत्ते व बाकी कॅट मधील उरलेले पत्ते साईड ला ठेवलेले व अंगझडती तील रोख रक्कम १६ हजार ७५० रुपये मिळून आले. त्यांना तेथे उपस्थित राहण्याबाबत विचारले असता बाळासाहेब कुरकुटे व सचिन नलावडे सदर ठिकाणी जुगार खेळण्यासाठी आलो आहेत असे सांगितले. त्यांची अंगझडती घेता अनुक्रम कुरकुटे यांच्याकडे रोख रक्कम १४० रुपये व नलावडे याचेकडे रोख रक्कम १०० रुपये मिळून आले. बबन रामजी शितोळे हा स्वतः जागेचा मालक असून त्यांची अंगझडती घेता त्याच्याकडे रोख रक्कम २९०० रुपये मिळून आले. तसेच सदर ठिकाणी जुगार खेळण्याकरिता जाण्यासाठी वापरण्यात आलेली एकूण १२ वाहने त्यांची एकूण किंमत ८ लाख 40 हजार रुपये सर्व रोख रक्कम व जुगाराची साधने तसेच वाहने असा एकूण किंमत ९ लाख ३९ हजार ३०० रुपये चा मुद्देमाल पंचांच्या समक्ष जप्त करण्यात आला.
याबत सुरज प्रभाकर बांबळे पोलीस हवालदार स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी आरोपिंच्या विरुद्ध सरकार तर्फे मुंबई जुगार कलम 12 (अ)प्रमाणे कायदेशीर फिर्याद दिली आरोपी व मुद्देमाल ओतुर पोलिसांच्या ताब्यात देऊन, गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई ओतुर पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि.रवींद्र मांजरे, पो. हवा. सुनील जावळे, पो. हवा.शरद बांबळे, पो. ना. दीपक साबळे चा.पो.शि. अक्षय नवले, पो. ना. गोसावी, पो.शि. कोकाटे, पो .शि. बनकर यांनी केली
शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close