जालना जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सतरावर
जालना- किरण वायाळ
जालना जिल्ह्यात आज सायंकाळी आणखी दोन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून परतूर तालुक्यातील सातोना परिसरातील यापूर्वी पॉझिटिव्ह आढळून आलेल्या तरुणांचा अहवाल आज पुन्हा दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे जिल्हावासीयांची चिंता वाढू लागली आहे. जालना येथील राज्य राखीव दलाच्या एका जवानासह परतूर येथील एक व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून परतूर तालुक्यातील सातोना नजीक असलेल्या एका रुग्णाचा अहवाल आज दुसऱ्यांदा पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. दरम्यान,आज दिवसभरात एकून तीन नवीन पॉझिटिव्ह रुग्णाची भर पडल्याने जालना जिल्ह्यातील एकून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता सतरा झाली आहे
कायदेशीर सल्लागार -
ॲड .दिनकर देसाई (मुंबई हायकोर्ट).
ॲड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे)
Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.