क्राईम

शिवनेरवार्ता

पिंपळवंडीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून म्रुत्यू

शिवनेरवार्ता न्यूज
आळेफाटा ( दि.१३)पिंपळवंडी येथे बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास कुकडी नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका सोळा वर्षाच्या तरूणचा पाण्यात बुडून म्रुत्यू झाला राहूल अशोक बिट्टे ( वय १६ वर्ष) असे या म्रुत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की पिंपळवंडी येथील भटकळवाडीत मूळचे बीड येथील असलेले अशोक बिट्टे हे गेल्या अनेक वर्षांपासून येथील एका शेतकऱ्याची शेती करत आहेत आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास अशोक बिट्टे आणि त्यांचे कुटुंबीय भटकळवाडी शिवारातील लेंडेमळा येेेथे येथे कुकडी नदीला लागून असलेल्या शेतात काम करत होते त्यावेळी त्यांचा मुलगा राहूल ( वय १६ वर्ष) हा आपल्या मित्रांसमवेत कुकडी नदीत पोहण्यासाठी गेला होता त्याच्या जवळ असलेल्या ट्यूबच्या सहाय्याने तो पोहत असताना अचानक ट्यूब उलटली व राहूल याचा तोल जाऊन पाण्यात पडला त्यावेळी त्याच्या समवेत असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला असता त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल रासकर सतिष काकडे आणि स्थानिक नागरिक जमा झाले व राहूला पाण्याबाहेर काढले परंतु तोपर्यत त्याचा म्रुत्यू झाला होता आळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले असून त्याच्यावर त्याच्या मूळगावी बिड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे याबाबत आळेफाटा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत
शेअर करा

iamadmin

कायदेशीर सल्लागार - ॲड .दिनकर देसाई (मुंबई हायकोर्ट). ॲड.तुषार पाचपुते ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close