महात्मा फुलेंचे काम समाजासाठी प्रेरणादायी:डॉ अनिल पाटील

बेल्हे -( दि १२एप्रील ) प्रतिनिधी

समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून सकारात्मक विचारसरणी आणि शैक्षणिक विकासासाठी कटिबद्ध राहून समाजोपयोगी कार्य शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम आम्ही करू असा संकल्प यावेळी संकुलातील शिक्षकांनी केला.
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करण्यात आली.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतरावजी शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके ,विश्वस्त वल्लभ शेळके ,अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अनिल पाटील व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
महात्मा फुले यांच्याबद्दल माहिती देताना संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले की,महात्मा फुले हे थोर लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते.त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली.तसेच वंचित मुलांसाठी त्यांनी शाळा स्थापन केली.स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होते.त्यामुळे जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली होती.
महात्मा फुलेंचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.अशा या थोर समाजसेवकांच्या प्रति आपण सर्वजण कृतज्ञ राहून त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊयात आणि आपले इप्सित शैक्षणिक कार्य अखंडितपणे समाजातील सर्व घटकापर्यंत निर्विवाद पोहचवूया असे आवाहन प्राचार्य डॉ.अनिल पाटील यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार प्रा.गणेश नवले यांनी मानले.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close