भुकंपाच्या सौम्य धक्क्याने संगमनेर व जुन्नर तालुक्यातील गावे हादरली
आळेफाटा -( दि २५) प्रतिनिधी

संगमनेर तालुक्यातील घारगाव बोटा माळवाडी व कुरकुटवाडी आंबी दुमाला केळेवाडी अकलापूर व संगमनेर तालुक्याच्या सरहद्दीवर असलेल्या जुन्नर तालुक्यातील आळे आळेफाटा वडगाव आनंद पिंपळवंडी आणि परिसरातील गावांना आज गुरूवारी ( दि २५) दुपारी चार वाजून छत्तीस मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जानवले त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत नाशिक येथील मेरी संस्थेशी संपर्क साधला असता त्यांनी हा भूकंपाचा धक्का ४.६ रिश्टर स्केलचा असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले
यापूर्वीही संगमनेर तालुक्यातील बोटा माळवाडी आळेखिंड कुरकुटवाडी परिसरात अनेकवेळा भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत तर एकदा भुकंपाच्या धक्क्याने बोटा येथील काही घराच्या भिंतींना तडे गेले होते याबाबत परिसरातील नागरिकांना पूर्वसूचना मिळविण्यासाठी काहीतरी उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे