महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने मढ येथील कोव्हीड योद्ध्यांचा सन्मान

मढ ( दि १०) प्रतिनिधी

क्रांतीजोती सावित्रीबाई महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित महात्मा फुले ब्रिगेडच्या वतीने मढ ( ता जुन्नर) येथे कोव्हीड योद्ध्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला

मढ ( ता जुन्नर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील
सावित्रीच्या लेकी आशा वर्कर्स डॉक्टर व नर्स यांना
शाल श्रीफळ सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन
कोव्हिडं योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
तसेच डॉक्टर व नर्स कर्मचारी यांना बालाजी उद्योग समूह व बी के टी टायर यांच्यावतीने सुरक्षा किट (पीपी किट) चे वाटप करण्यात आले
कोरोनाच्या संकट काळात प्रत्येक गावा गावात आशा वर्कर्स यांनी अखंडपणे मदत कार्य सुरू ठेवलेले आहे अशा जुन्नर तालुक्यातील सर्वच आशा वर्कर्सचा गावागावात जाऊन टप्प्याटप्प्याने ब्रिगेडच्या वतीने सन्मान करण्यात येत असल्याची माहिती महात्मा फुले ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष दत्ता शिंदे यांनी दिली

यावेळी आरोग्य अधिकारी डॉक्टर श्याम बनकर ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ शिंदे, प्राथमिक आरोग्य केंद्र डॉक्टर सारोक्‍ते मॅडम डॉक्टर चोपडा सर, माजी पंचायत समिती सदस्य महेंद्र सदाकाळ सरपंच संतोष मस्करे पत्रकार अशोक मस्करे, तालुका उपाध्यक्ष किरण शेठ वाघुले जुन्नर शहराध्यक्ष संजय डोके,नितिन शेरकर, आळेफाटा शहराध्यक्ष मनीष गडगे ओतूर शहर अध्यक्ष विक्रम गिते उपाध्यक्ष नितीन डोके संदीप डोके,सुधीर बटवाल एकनाथ शिंदे जालिंदर शिंदे आळे गावचे अध्यक्ष ऋषिकेश वाघोले, सागर भास्कर इतर मान्यवर उपस्थित होते

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक - श्री विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर -9665553838 / 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुधीर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुजाता प्रदीप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close