काव्यातील नक्षत्र या ई मासिकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न
पुणे -( दि १९) राजेंद्रकुमार शेळके

नक्षञाचं देणं काव्यमंच,मुख्यालय,पुणे वतीने दर महिन्याला ई मासिकाचे प्रकाशन केले जाते. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त युवादिनी “काव्यातील नक्षञ” मासिकाच्या नवव्या अंकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा”संपन्न झाला. यावेळी अॅड प्रफुल्ल भुजबळ महाराज म्हणाले की,”नक्षञाचं देणं काव्यमंच समाजातील संवेदना जपणारी संस्था आहे.कवींसाठी वेगवेगळी उपक्रम राबवुन त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळून देत आहे.कार्यक्रमातील विविध हे सुध्दा संस्थेने जपले आहे.भविष्यातील कवींना महाराष्टातील एकमेव व्यासपीठ असावे.त्यांच्या कार्याला माझ्या शुभेच्छा
नक्षञाचं देणं काव्यमंच,पुणे तर्फे दर महिन्याला प्रकाशित होणारे हे डिजिटल ई-मासिक “काव्यातील नक्षञ” आहे. .कवींच्या हक्काचे…सन्मानाचे ,आदराचे व्यासपीठ नक्षञाचं देणं काव्यमंच होय.२१ वर्षांच्या अखंड वाटचालीत अनेक विविध उपक्रम यशस्वी केले आहे.ई मासिकाच्या माध्यमातुन कवी-कवयिञींना लिहिते करुन…त्यांच्या कवितांना यात स्थान दिले आहे.”काव्यातील नक्षञ”हे विनामूल्य वितरण व प्रकाशन केले जाते.त्यामुळे सर्वांनी यात सहभाग घेऊन ,अनेकांना पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले या प्रसंगी शिक्षणतज्ञ ह.भ.प.डाॅ.रवींद्र सोमंशी कविवर्या सौ.शारदा लोंढे
कविवर्य अनिल जाधव कविवर्य श्री.महेश मोरे कविवर्या दया घोंगे कविवर्य श्री शाहू संभाजी भारती कविवर्य रमेशकुमार नांगरे कविवर्या सौ.सरस्वती घाडगे कविवर्य दिलीप विधाटे.कविवर्य शिवनाथ गायकवाड उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन-संपादक- प्रा.राजेंद्र सोनवणे कवी वादळकार,पुणे यांनी केले