नगर कल्याण महामार्गाच्या दुरूस्तीचे मनसेच्या कार्यकर्त्यांनी पाडले बंद : निक्रुष्ट दर्जाचे काम होत असल्याची तक्रार
मढ -( दि १९) शिवनेर वार्ता न्यूज नेटवर्क

नगर कल्याण महामार्गाचे मढ करंजाळे माळशेज घाट या दरम्यान सुरु असलेले महामार्ग दुरूस्तीचे काम निक्रुष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे काम बंद केले
नगर कल्याण महामार्गावरील मढ ते करंजाळे खुबी माळशेज घाट हा रस्ता अत्यंत खराब झाला होता
या महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले होते त्यामुळे
हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी मनसेच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष मकरंद पाटे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे शिरूर लोकसभेचे खासदार डाॅ अमोल कोल्हे यांचेकडे केली होती त्यानंतर डाॅ अमोल कोल्हे यांनी हे काम सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला त्यानंतर महामार्ग दुरूस्तीचे काम सुरु करण्यात आले मात्र हे काम अत्यंत निक्रुष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार मनसेचे जुन्नर तालुका पश्चिम विभाग प्रमुख नंदकिशोर जगताप व मनेच्या कार्यकर्त्यांनी केली या महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमध्ये प्रथम डांबर न टाकताच हे काम सुरु होते त्यामुळे हे काम बंद करण्यात आले आहे तसेच
हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने याचे काम चांगल्या दर्जाचे व्हावे अशी आमची मागणी आहे असे नंदकिशोर जगताप यांनी सांगितले