चाळकवाडीच्या शिवांजली विद्या निकेतनमध्ये स्वच्छता अभियान व मार्गदर्शन
पिंपळवंडी -( दि १९) शिवनेर वार्ता न्यूज नेटवर्क

सी एस आर डी महाविद्यालय अहमदनगर या ठिकाणी एम एस डब्ल्यूचे शिक्षण घेणारी विद्यार्थीनी तेजस्विनी म्हस्के तसेच शिवांजली विद्या निकेतनच्या विद्यार्थ्यांनींनी चाळकवाडी येथील शिवांजली विद्या निकेतनमध्ये स्वच्छता अभीयान राबविले यावेळी या सर्व विद्यार्थीनींनी शालेय परिसराची स्वच्छता केली तसेच तेजस्विनी म्हस्के ही या विद्यालयाची माजी विद्यार्थीनी असून तिने आपल्या गावाबद्दल व शाळेबद्दल असलेल्या क्रुतज्ञनतेच्या भावनेतून विद्यालयातील विद्यार्थ्यांना एडस व सामाजिक उपक्रमातील आपली कर्तव्य या विषयी मार्गदर्शन केले या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी आर चासकर
जेष्ठ शिक्षक बी डी जाधव श्रीमती एस के गोपाळे
अशोक कु-हाडे बंडू सदामते विष्णु बोरसे प्रशांत शेटे
व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते