प्रवासी व रहदारीच्या ठिकाणीच मद्यपान करणाऱ्या मद्यापीना हटवा – अर्चना पाटील
ठाणे / दिवा, (ता १७) संतोष पडवळ (विभागीय संपादक)

दिवा शहराच्या प्रवेश द्वारावरच दुपार,सायंकाळच्या वेळेस मद्यपान करणाऱ्या तळीरामांचा थवा दिसत असल्याने शहराच्या प्रतिमेला धक्का लागत असून याठिकाणी असणाऱ्या लोकल सर्वसामान्य लोकांना बंद असल्याने ठाणे, मुंबई व नवी मुंबईकडे जाणाऱ्या मोठ्या बस थांब्या जवळच हा प्रकार घडत असल्याने याचा त्रास महिलावर्ग, नागरिकांना होत आहे,परिणामी येथे उघड्या जागेत मद्यपान करणाऱ्या तळीरामांना तातडीने हटवा अशी मागणी भाजपच्या दिवा मंडळ महिला अध्यक्षा सौ.अर्चना निलेश पाटील यांनी केली आहे.
मागील काही वर्षांपासून दिवा शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या टनिंग येथे मोकळ्या जागेत रस्त्यालगत तळीराम बस्तान बांधून असून या लोकांना कुणाचीच भीती वाटत नाही.शहराच्या सुरवातीला च मद्यपान करणारे लोक शेकडोंच्या संख्येने बसलेले असल्याने यातून शहाराबाबत नकारात्मक चित्र निर्माण होत आहे.दिवा टनिंग हा दिव्यातील रहदारीच्या ठिकाणांपैकी एक असून येथे आजूबाजूला हॉस्पिटल,शाळा आहेत.दिवा शहरातून ठाणे,नवी मुंबईत जाणाऱ्या बस येथून सुटतात,शहरातील विविध भागांतील महिला याच भागातून आपल्या घरी पायी चालत जात असतात परिणाम या मद्यपान करणाऱ्यांमुळे महिला वर्ग,नागरिक यांना त्रास होत असतो असे अर्चना पाटील यांनी म्हटले आहे.दिवा शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करता,व नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन येथील उघड्यावर मैदानात, रस्त्याच्या कडेला बसलेल्या मद्यपान करणाऱ्या तळीरामांचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी दिव्यातील महिलांच्या वतीने सौ.अर्चना पाटील यांनी पोलीस प्रशासन,पालिका यांच्याकडे केली आहे.मागील काही महिन्यांपासून आपण या प्रश्नावर प्रशासनाकडे पाठपुरावा करत असून हा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा अशी मागणी अर्चना पाटील यांनी केली आहे.