बेल्हे येथील समर्थ शैक्षणिक संकुलात नवीन अभ्यासक्रमांना मान्यता

बेल्हे ( दि ३) प्रतिनिधी

बेल्हे बांगरवाडी ( ता जुन्नर) येथील समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स या महाविद्यालयास नुकतीच महाराष्ट्र शासनाने बी.कॉम.(इंग्रजी माध्यम) एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) व एम.एस्सी.(कॉम्प्युटर ॲप्लिकेशन) हे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप यांनी दिली अभ्यासक्रमाचे नाव,कालावधी व प्रवेश पात्रता पुढीलप्रमाणे: बी.कॉम.(इंग्रजी माध्यम) कालावधी:-३ वर्षे प्रवेश पात्रता:- बारावी कॉमर्स उत्तीर्ण एम.एस्सी.(कॉम्प्युटर अॅप्लिकेशन) कालावधी:-२ वर्ष प्रवेश पात्रता:-सायन्स/इंजीनियरिंग/टेक्नॉलॉजी पदवीधर (खुला गट-५०%,मागासवर्गीय-४५ %) एम.एस्सी.(कॉम्प्युटर सायन्स) कालावधी:-२ वर्षे प्रवेश पात्रता:-बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स उत्तीर्ण (खुला गट-५०%,मागासवर्गीय-४५ %)
तसेच येत्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून *डिग्री व डिप्लोमा कॉलेज साठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग(प्रवेश क्षमता ३०)* हा नवीन कोर्स सुरू होत आहे.सदर अभ्यासक्रमासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांची नुकतीच परवानगी प्राप्त झाल्याची माहिती संस्थेचे सचिव विवेक शेळके यांनी दिली.समर्थ शैक्षणिक संकुलात समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट व समर्थ पॉलिटेक्निक ही डिग्री व डिप्लोमा महाविद्यालये सुरू आहेत.त्यामध्ये सिव्हील इंजि,कॉम्प्युटर इंजि,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली इंजि,मेकॅनिकल इंजि (प्रत्येकी प्रवेश क्षमता-६०) हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

ऑटोमोबाईल क्षेत्रात होत असलेले बदल विशेष करून इलेक्ट्रिकल वाहनांची निर्मिती व त्यामुळे या क्षेत्रात निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या व व्यवसायाच्या प्रचंड संधी लक्षात घेता विद्यार्थी व पालकांची सदर अभ्यासक्रम सुरू करण्यास मागणी होती.सदर अभ्यासक्रम सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची फार मोठी सोय होणार आहे.समर्थ शैक्षणिक संकुलात टाटा मोटर्स चे विभागीय प्रशिक्षण केंद्र,टोयोटा टेक्निकल एज्युकेशन प्रोग्रॅम,महिंद्रा सी आय इ ट्रेनिंग सेंटर,टॅफे ट्रेनिंग सेंटर,प्रधानमंत्री कौशल्य केंद्र यांसारखे कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम असल्याने नव्याने सुरू झालेला *इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग* हा अभ्यासक्रम या सर्वांना पूरक ठरेल व त्यामुळे विद्यार्थी अधिक सक्षम होईल असे विश्वस्त वल्लभ शेळके म्हणाले.या अभ्यासक्रमाचे प्रवेश शासनाने निर्धारित केलेल्या नियमानुसार होणार आहेत तरी अधिक माहितीसाठी www.sreir.org या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी.

शेअर करा

iamadmin

मुख्य संपादक- विजय चाळक कार्यालय - पिंपळवंडी (चाळकवाडी) ता जुन्नर जि पुणे मोबाईल नंबर- 7350986395 ======================================= कायदेशीर सल्लागार - ॲड. अद्वैत चव्हाण - संस्थापक महाडिजिटल मिडीया असोसिएशन ॲड .दिनकर देसाई - (मुंबई हायकोर्ट) ॲड.तुषार पाचपुते - ( जिल्हा व सत्र न्यायालय पुणे) ॲड सुजाता प्रदिप गाडेकर - ( जुन्नर न्यायालय) ॲड सुधिर कोकाटे - ( जुन्नर न्यायालय) ॲड.जयवंत प्रभाकर सोनवणे ( जुन्नर न्यायालय)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
या न्यूज पोर्टल वरील बातम्या कॉपी करू नये.
Close
Close